रस्त्यावर चिखल झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:33 IST2019-07-30T12:33:09+5:302019-07-30T12:33:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  प्रकाशा ते शहादा रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम सुरू आहे तेथे ...

Three hours of traffic jam due to mud on the road | रस्त्यावर चिखल झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प

रस्त्यावर चिखल झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा :  प्रकाशा ते शहादा रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम सुरू आहे तेथे मातीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने या मातीच्या पर्यायी रस्त्यांवर प्रचंड चिखल साचल्याने वाहनधारक अक्षरश: कंटाळले आहेत. हा प्रकार नित्याचाच झाल्याने प्रकाशा ग्रामस्थ कंटाळले असून मंगळवारी रस्ता रोको करणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मोठी अडचण येत आहे. मातीच्या भराव ज्याठिकाणी केला आहे अशा ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. या चिखलामुळे लहान-मोठी वाहने  घसरुन अपघातही होत आहेत. अशीच परिस्थिती कोरीट पेट्रोल पंपाजवळ झाली असून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सोमवारी सकाळी मालवाहू टेम्पो उलटून अपघात झाला. सोमवारी दुपारी तीन वाजेपासून तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यात शहादा येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीही बसमध्ये अडकून पडले. तीन ते चार तास  वाहतूक ठप्प झाल्याने या विद्याथ्र्याचे पालकही हैराण झाले होते. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ते मातीचे केल्याने पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत आहे. या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. या समस्येवर प्रभावी उपाययोजनेसाठी प्रकाशा येथे मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वि.का. सोसायटीचे अध्यक्ष हरी पाटील यांनी दिली.
 

Web Title: Three hours of traffic jam due to mud on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.