७४ हजाराच्या विद्युत मोटारी लंपास करणारे तिघे अटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:35 IST2021-02-09T12:35:27+5:302021-02-09T12:35:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहादा येथे ७४ हजार रुपयांची विद्युत मोटार चोरीप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

Three arrested for lighting 74,000 electric cars | ७४ हजाराच्या विद्युत मोटारी लंपास करणारे तिघे अटके

७४ हजाराच्या विद्युत मोटारी लंपास करणारे तिघे अटके

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शहादा येथे ७४ हजार रुपयांची विद्युत मोटार चोरीप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
किशोर अमेसिंग ठाकरे, रा. मोड, ता. तळोदा, दीपक भरत ठाकरे, रा. खेडले, ता. तळोदा व भरत जंगू ठाकरे, रा. सिलिंगपूर, ता. तळोदा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस सुत्रांनुसार, शहादा येथील जुना प्रकाशा रोड भागात सिराज अयाज अन्सारी यांनी त्यांच्या जागेवर नऊ विद्युत मोटार ठेवल्या होत्या. त्यांची किंमत ७४ हजार रुपये इतकी आहे. ११ जानेवारी रोजी किशोर ठाकरे, दीपक ठाकरे व भरत ठाकरे यांनी त्या चोरून नेल्या. 
सकाळी ही बाब लक्षात आल्यावर सिराज अन्सारी यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध शहादा पोलीस       ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना      अटक करण्यात आली आहे.     फौजदार सोनवणे तपास करीत  आहेत.
दरम्यान, या तिघांकडून विद्युत मोटारी चोरी झाल्याच्या इतरी घटनांची देखील उकल होणार आहे. शहादा व तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणाव शेतातून विद्युत मोटारी लंपास झाल्या आहेत. 

Web Title: Three arrested for lighting 74,000 electric cars