मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या वादातून विश्वस्तास मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:05+5:302021-08-22T04:33:05+5:30
नंदुरबार- मंदिराच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करू नका असे सांगितल्याच्या रागातून जमावाने विश्वस्तास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पिंगाणे, ता.शहादा ...

मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या वादातून विश्वस्तास मारण्याची धमकी
नंदुरबार- मंदिराच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करू नका असे सांगितल्याच्या रागातून जमावाने विश्वस्तास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पिंगाणे, ता.शहादा येथे घडली. याप्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंगाणे, ता.शहादा येथे गोपाळकृष्ण मंदिर संस्थान आहे. संस्थानची गावात मोठी जागा आहे. त्या मोकळ्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत विश्वस्त भगवान दशरथ पाटील हे त्यांना सांगण्यास गेले असता जमावाने त्यांच्या अंगावर धावून जात ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना ३० जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. याप्रकरणी भगवान पाटील यांनी २१ ऑगस्ट रोजी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने मधुकर बन्सी भोई, संतोष देवराम भोई, भरत शामा भोई, नामदेव काशिराम भोई, बापू सुकदेव भोई, पप्पू मोहन भोई, पांडुरंग शांतीलाल भोई, राजू सुकलाल भोई, हिरामण मगन भोई व जगदीश नामदेव भोई, सर्व रा.शहादा यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ करीत आहे.