शहादा ग्रामीण रुग्णालयातून चोरट्यांनी लांबवल्या बॅटऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 20:49 IST2019-04-29T20:49:25+5:302019-04-29T20:49:50+5:30
नंदुरबार : शहादा ग्रामीण रुग्णालयात ठेवलेल्या बॅटºया अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार ...

शहादा ग्रामीण रुग्णालयातून चोरट्यांनी लांबवल्या बॅटऱ्या
नंदुरबार : शहादा ग्रामीण रुग्णालयात ठेवलेल्या बॅटºया अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता़
ग्रामीण रुग्णालयात ठेवलेल्या चार बॅटºया चोरीला गेल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळी दिसून आले होते़ त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली होती़ तब्बल १२ हजार रुपयांच्या चार बॅटºया रुग्णालयाच्या इमारतीतून चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ २४ तास वर्दळ असताना घडलेल्या या प्रकारामुळे चर्चा सुरु झाली आहे़
याबाबत रविंद्र शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक कापुरे करीत आहेत़