हॉटेल परिसरातून दुचाकीसह हजारोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:43 IST2019-11-12T12:42:53+5:302019-11-12T12:43:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्गावरील हॉटेलच्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून चालकाचा ऐवज तसेच त्याच परिसरातून चोरटय़ांनी दुचाकीदेखील चोरून ...

हॉटेल परिसरातून दुचाकीसह हजारोंचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महामार्गावरील हॉटेलच्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रकमधून चालकाचा ऐवज तसेच त्याच परिसरातून चोरटय़ांनी दुचाकीदेखील चोरून नेल्याची घटना कोठली, ता.शहादा शिवारात घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर कोठली शिवारातील हॉटेल परिसरात ही घटना घडली. याबाबत पोलीस सूत्रांनुसार, 9 रोजी रात्री हॉटेल परिसरात दुचाकी उभी करण्यात आली होती. शिवाय याच ठिकाणी काही ट्रका देखील थांबलेल्या होत्या. चोरटय़ांनी दुचाकी लंपास केली.
शिवाय ट्रकच्या कॅबीनमधून चालकाचे दोन मोबाईल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे देखील चोरटय़ांनी लांबविले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ठिकठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु उपयोग झाला नाही.
याबाबतत हॉटेल चालक पौलादसिंग हंबरसिंग गिरासे, रा.कोठली यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहे.