दोन ठिकाणी घरफोडीत हजारोंचा ऐवज लपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:26 IST2019-11-14T12:26:18+5:302019-11-14T12:26:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरटय़ांनी 56 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. होळ ...

Thousands looted in two places | दोन ठिकाणी घरफोडीत हजारोंचा ऐवज लपास

दोन ठिकाणी घरफोडीत हजारोंचा ऐवज लपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये चोरटय़ांनी 56 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. होळ शिवारातील ओमसाई पार्क आणि कोरीटरोडवरील जमनादास पार्क येथे या घटना घडल्या.
शहरात सध्या घरफोडींचे सत्र सुरू आहे. दिवाळीपासून हे सत्र  सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 11 रोजी देखीेल दोन ठिकाणी चोरटय़ांनी घरफोडी केली. होळ शिवारात असलेल्या ओमसाई पार्क मधील प्लॉट क्रमांक 121 मध्ये पहिली घटना घडली. 
सुरेश हरी जरे यांच्या बंधूंचे हे घर आहे. ते बाहेर गावी गेल्याने चोरटय़ांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 35 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागीने आणि दहा हजार रुपये रोख असा 45 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसात  सुरेश हरी जरे यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. तपास फौजदार पवार करीत आहे. 
दुसरी घटना कोरीट रस्त्यावर जमनादास पार्क येथे घडली. प्रशांत श्रीराम पाटील हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे   कुलूप तोडून आत प्रवेश  केला. घरातील 10 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागीने चोरून  नेले.
याबाबत प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनगर करीत  आहे.
 

Web Title: Thousands looted in two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.