नंदुरबारातील दोन ठिकाणच्या घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:39 IST2019-05-09T11:39:10+5:302019-05-09T11:39:32+5:30

नंदुरबार : शहरातील संजय इंदिरा नगर व आनंद नगर येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ३४ हजार रुपये रोख व सोने-चांदीचे ...

Than thousands of houses in Nandurbar | नंदुरबारातील दोन ठिकाणच्या घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

नंदुरबारातील दोन ठिकाणच्या घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

नंदुरबार : शहरातील संजय इंदिरा नगर व आनंद नगर येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ३४ हजार रुपये रोख व सोने-चांदीचे दागीने लंपास केले. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलीस हद्दीत येणार संजय इंदिरा नगर व आनंद नगर भागातील प्लॉट क्रमांक १३९/१४० येथे चोरट्यांनी घरफोडी केली. पुष्पेंद्र आत्माराम चव्हाण हे २८ एप्रिल रोजी बाहेर गावी गेले होते. ७ मे रोजी ते परत आल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घरफोडीत चोरट्यांनी रोख ३४ हजार रुपये व सोने, चांदीचे दागीने लंपास केले. परिसरात दोन ठिकाणी ही चोरी झाली. याबाबत पुष्पेंद्र आत्माराम चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शिरसाठ करीत आहे.
सध्या सुटीचा कालावधी आहे. त्यामुळे अनेक घरमालक बाहेरगावी गेले आहेत. ती संधी चोरटे साधत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी नवीन वसाहतींच्या भागात गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Than thousands of houses in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.