बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:30 PM2020-04-03T12:30:38+5:302020-04-03T12:30:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल ...

Thousands of citizens came from outside the country | बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल २३ हजार नागरिक परतले आहेत़ येथील मूळ रहिवासी असलेल्या या नागरिकांचे मोठ्या शहरांमध्ये हाल होण्याची शक्यता असल्याने त्यांनी गावाची वाट धरली होती़ या सर्वांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून एकासही कोरोनासारखी लक्षणे असलेले किरकोळ आजार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़
देशात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यानंतर जिल्ह्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक यासह राज्यातील इतर मोठी शहरे आणि देशातील इतर शहरांमध्ये निवास करणाऱ्यांनी जिल्ह्याची वाट धरली होती़ मिळेल त्या वाहनाने या ‘भूमीपुत्रां’चे लोंढे जिल्ह्यात येत होते़ या लोंढ्यांमधून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती असल्याने पोलीस दलाने जिल्हा आणि राज्य सीमेवर त्यांची तपासणी केी होती़ या सर्वांची सिमेवर तपासणी करण्यात आल्यानंतर घरीही त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनीही भेटी दिल्या होत्या़ यातून या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती असून एकातही कोरोनाची लक्षणे किंवा तत्सम आजारही नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आणि तलाठी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या या पथकांकडून दर दिवशी घेतल्या जाणाºया आढाव्यामुळे रोज सद्यस्थिती समोर येत आहे़ दरम्यान जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांचे लोंढे थांबलेले नसून दरदिवशी नागरिक मिळेल त्या मार्गाने येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाकडून ९ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर येणाºया नागरिकांच्या लोंढ्यामुळे चिंता असली तरी त्यांच्या आरोग्य तपासणीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे़


आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या २२ हजार ८०० नागरिकांच्या आतापर्यंत तपासण्या पूर्ण केल्या आहेत़
यात नवापुर येथील एकास सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते़ नवापुरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्याच्या कुटूंबाची भेट घेत माहिती जाणून घेतली असता, संबधित व्यक्ती हा पुणे येथून आल्याचे सांगण्यात आले होते़ त्याचे स्वॅब नमुने पुणे येथे एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते़ दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़
प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसात नंदुरबार तालुक्यात ८ हजार ३७२, शहादा ६ हजार ३६१, तळोदा ८३५, अक्कलकुवा ३ हजार ७००, नवापुर तालुक्यात १ हजार ८८२ तर धडगाव तालुक्यात १ हजार ५६० बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या २२ हजार ८०० पैकी एकासही कोरोनासदृश लक्षणे नसून त्यांच्या प्रकृतीवर ग्रामसमित्या लक्ष ठेवून आहेत़
दक्षता म्हणून आरोग्य विभागाकडून तालुकानिहाय किमान ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे पथक दरदिवशी क्वारंटाईन नागरिकांची चौकशी करुन अहवाल आरोग्य विभागाकडे देत आहेत़
शहादा तालुक्यात ३ हजार ३४६ नागरिकांचे दक्षता म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते़ यात २० जण हे परदेशातून आले असल्याची माहिती देण्यात आली होती़ सर्व २० जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर या सर्वांची प्रकृती सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान शुक्रवारपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आशा आणि अंगणवाडी सेविका यांचे पथक घरोघरी पुन्हा सर्वेक्षण करणार असून त्यांच्याकडून किरकोळ आजारींची माहिती संकलित होणार आहे़

Web Title: Thousands of citizens came from outside the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.