अक्कलकुव्यातील त्या गटारी केवळ नावालाच झाल्या तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:30+5:302021-06-17T04:21:30+5:30
निधी अद्याप पडून असला तरी ग्रामपंचायत मात्र उर्वरित ठिकाणी कामे प्रस्तावित करण्यास विरोध करत असल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत ...

अक्कलकुव्यातील त्या गटारी केवळ नावालाच झाल्या तयार
निधी अद्याप पडून असला तरी ग्रामपंचायत मात्र उर्वरित ठिकाणी कामे प्रस्तावित करण्यास विरोध करत असल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत गटारींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार हर्षद बोहरा यांना संपर्क केला असता, चुकीच्या ठिकाणी काम केले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शासनाने सांगून दिलेल्या श्रीराम कॉलनीतच काम केले असून अक्कलकुवा शहरात श्रीराम चाैकच नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ठेकेदाराच्या या अजब दाव्याबाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, अक्कलकुवा शहरात श्रीराम चाैक आणि श्रीराम नगर असे दोन्ही आहेत. या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी गटविकास अधिकारी यांना आदेश दिले असून त्यांची चाैकशी पूर्ण झाली आहे. चाैकशीचा अहवाल लवकरच जिल्हा परिषदेला प्राप्त होईल, त्यानंतर दोषींवर कारवाई होणार आहे.