उकीरड्यावरील शेणखताच्या वादातून खोंडामळीत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:12 IST2019-04-04T12:12:49+5:302019-04-04T12:12:54+5:30
किरकोळ वाद : दोन्ही कुटूंबांकडून परस्परविरोधात फिर्याद

उकीरड्यावरील शेणखताच्या वादातून खोंडामळीत तुंबळ हाणामारी
नंदुरबार : तालुक्यातील खोंडामळी येथे उकीरड्यावरील शेणखत उचलण्याच्या वादातून दोन कुंटूबात तुंबळ हाणामारी झाली़ यात तिघे जखमी झाले आहेत़ ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती़
खोंडामळी येथील भिमराव राजाराम पाटील व मधुकर पाटील यांच्यात गावातील उकीरड्यावर पडून असलेले शेणखत उचलण्यावरुन गेल्या आठवड्यात वाद झाला होता़ यातून सोमवारी सायंकाळी दोन्ही कुटूंबात पुन्हा वाद उफाळून आला़ यातून दोन्ही कुटूंबिय एकमेकांवर धावून जात हाणामारी झाली़ हाणामारीदरम्यान भिमराव राजाराम पाटील यांच्या डोक्यात अक्षय मधुकर पाटील याने कुºहाड घातल्याने ते जखमी झाले होते तसेच त्याच्या पत्नी कविता, मुलगा प्रविण हेही मारहाणीत जखमी झाले़ दुसऱ्या गटातील सुरेखाबाई मधुकर पाटील, मधुकर पाटील, अक्षय पाटील व दिनेश पाटील हेही जखमी झाले़
घटनेनंतर भिमराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन मधुकर बाजीराव पाटील, अक्षय मधुकर पाटील, दिनेश मधुकर पाटील व त्याचा शालक यांच्याविरोधात तर सुरेखाबाई मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिमराव पाटील, प्रविण भिमराव पाटील, विलास भिमराव पाटील, भूषण विलास पाटील सर्व रा़ खोंडमळी यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अहिरे करत आहेत़ मारहाणप्रकरणी पोलीसांनी मधुकर बाजीराव पाटील, अक्षय आणि दिनेश मधुकर पाटील यांना अटक केली होती़ त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने कोठडी सुनावल्याची माहिती आहे़ दरम्यान पोलीसांकडून तपास सुरु आहे़