डेल्टाप्लसच्या रुपात येणारी तिसरी लाट धोकादायक- आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:03+5:302021-09-06T04:35:03+5:30
या वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक ...

डेल्टाप्लसच्या रुपात येणारी तिसरी लाट धोकादायक- आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये चर्चा
या वेबिनारचे उद्घाटन विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून कॅलिफोर्निया येथील डॉ. सुजाता पवार होत्या. कोरोनाची वर्तमानकालीन परिस्थिती, भविष्यकालीन परिस्थिती, अमेरिकेतील कोरोना परिस्थिती व भारतातील कोरोना परिस्थिती, तसेच कोरोना डेल्टा प्लसच्या माध्यमातून नवीन रूप कसे धारण करत असल्याबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई मोरे उपस्थित होत्या. आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एच. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. व्ही. देवरे होते. सूत्रसंचालन प्रा. विजय खंडारे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. बी. देशमुख यांनी आभार मानले.