पालिकांकडून फवारणीचा तिसरा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:39 IST2020-04-14T12:39:06+5:302020-04-14T12:39:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीत अग्निशमन दलांची मदत घेत सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्याचे आदेश शासनाने ...

Third phase of spraying by municipalities | पालिकांकडून फवारणीचा तिसरा टप्पा

पालिकांकडून फवारणीचा तिसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीत अग्निशमन दलांची मदत घेत सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ हे आदेश येण्यापूर्वी जिल्ह्यातील चारही पालिका आणि एक नगरपंचायत यांच्याकडून फवारणी सुरु असून आतापर्यंत या सर्वांनी मिळून तीन हजार लीटर द्रव्य फवारुन निर्जंतुकीकरण करुन घेतले आहे़
नंदुरबार नगरपालिकेकडून शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये गेल्या २२ तारखेपासून सातत्याने फवारणी व कोरोनाबाबत जागृती सुरु आहे़ प्रारंभी पालिकेने नुवान हे प्रभावी औषध वापरुन फवारणी केली होती़ साधारण २०० लीटर फवारणी करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने शासनाच्या आदेशाने आतापर्यंत ६०० लीटर सोडियम हायड्रोक्लाराईडची फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले आहे़ यासाठी १० ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले होते़ शहरात पहिल्या दोन टप्प्यात फवारणी पूर्ण करण्यात आली असून तिसºया टप्प्यातील फवारणीला सुरुवात होत आहे़
शहादा पालिकेंतर्गत शहरातील १३ प्रभाग आणि शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतींमध्ये तब्बल अडीच हजार लीटर सोडियम हायड्रोक्लोराईड वापरण्यात आले आहे़ हे द्रव्य फवारणीसाठी शासनाचा आदेश येण्यापूर्वी शहादा पालिकेने अग्निशमन दलाचे १ वाहन स्वतंत्रपणे केवळ फवारणीसाठी तयार करुन घेत कामकाज सुरु केले होते़ सोबत वेळोवेळी नागरिकांकडून देण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातूनही शहरासह लगतच्या परिसरात फवारणी पूर्ण करण्यात आली आहे़ पालिकेचे तिसºया टप्प्याची फवारणी पूर्ण होत आली आहे़ तळोदा नगरपालिकेने शहरातील सात प्रभागांमध्ये ३०० लीटर सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करुन घेतली आहे़ पालिकेचा तिसरा टप्पा सुरु आहे़
नवापुर पालिकेने सर्व १० प्रभागांमध्ये पहिल्या फेरीत पालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने ११० लीटर नुवान हे द्रव्य वापरुन निर्जंतुकीकरण केले गेले होते़ दुसºया फेरीत शासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत चार प्रभागात ४० लीटर सोडियम हायड्रोक्लोराईड फवारले गेले आहे़ पालिका कर्मचारी शहरातील रहिवासी वस्त्या, शेल्टर होम, आयसोलेशन वॉर्ड यासह बँका आणि रंगावली परिसरातील भाजीबाजारातही नियमित फवारणी करत आहेत़ धडगाव नगरपंचायतीेने सर्व सहा प्रभागात सोडियम क्लोराईडची फवारणी केली आहे़
निर्जंतुकीकरणासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या सोडियम हायड्रोक्लोराईडमुळे कामानिमित्त बाहेर येणाऱ्यांना बाहेरील वस्तूतून संसर्गाचा धोका कमी होतो आहे़ शहादा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात अडीच हजार लीटर फवारणी करताना कर्मचाºयांनी गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य दिले आहे़ यात बँका, भाजीपाला बाजार यांचा समावेश आहे़ नंदुरबार शहरातही जागोजागी निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़

Web Title: Third phase of spraying by municipalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.