On the third day a permanent encroachment landslide | तिसऱ्या दिवशी पक्के अतिक्रमण जमीनदोस्त
तिसऱ्या दिवशी पक्के अतिक्रमण जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील अतिक्रमणधारक व्यवसायिकांना केलेल्या आवाहनानंतर पालिका प्रशासनातर्फे तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. तिसºया पक्या अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात आला.
शहादा शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमण धारकांमुळे गिळंकृत झाले होते. वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या सौदर्याला अडथळा निर्माण होवून वाहतुकीच्या प्रश्नाने ज्वलंत रूप धारण करीत असतांना शहरातील बेकायदेशीर आतिक्रमण काढावे अशी मागणी जोर धरु लागली होती. पालिका प्रशासनाने अतिक्रमणाचा मुद्दा शासकीय पटलावर घेवून अतिक्रमण मोहिम राबविण्याचा आराखडा तयार केला. त्यानुसार शहरातील अतिक्रमण धारकांना सूचना देवून आपले अतिक्रमण त्वरीत काढून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र दरवर्षीच आव्हान दिले जाते असे समजून पालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पालिकेने प्रत्यक्ष कृतीने चांगलेच उत्तर दिले आहे.
प्रशासानाच्या कारवाईची धास्ती घेत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढून घेतलीत. अतिक्रमणे काढून घेण्याच्या आवाहनाला अनेक अतिक्रमण धारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ज्यांना नोटीसा आणि सूचना देवूनही अतिक्रमण काढले नाही अशा अतिक्रमणावर अखेर पालिकेने बुलडोझर चालविला.
शहरातील मेन रोड, चार रस्ता परिसर, जुना प्रकाशा रोड, भाजी मंडई परिसरात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढण्यात आली. दोन दिवसापूर्वी काही अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याबाबत तोंडी सूचना देवून आतिक्रमण स्वत:हून काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. अतिक्रमण काढण्याच्या सूचना देवूनही अतिक्रमन काढल्यामुळे पालिकेच्या वतीने विविध भागातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
शहरातील अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासनाने ठोस पाऊले उचलत अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. प्रशासनाने घेतलेला पवित्रा बघत अनेकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतल्याने होणाºया नुकसानीपासून बचाव केला. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून अतिक्रमण करून व्यवसाय करणाºया अतिक्रमण धारकावरही पालिकेने कारवाईचा बडगा उगारीत अशी जुनी अतिक्रमणे जमिनदोस्त केली. शुक्रवारी दिवसभरात १२ पक्के अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले.
या वेळी अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, कार्यालय अधीक्षक माधव गाजरे, अभियंता संदीप टेंभेकर, आशिष महाजन, संदीप चौधरी, सचिन महाडीक, राजू चव्हाण व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
पालिकेच्या वतीने शहरातील भाजी मंडई परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्यात आले. त्यात अनेक अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण काढले आहे. या परिसरात पुन्हा काही लॉरी धारकांनी अतिक्रमण करण्यास सुरूवात केली आहे. लॉरी लावण्याच्या वादावरून दोन व्यवसायिकांनीमध्ये वाद झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमण पुन्हा वाढू नये यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: On the third day a permanent encroachment landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.