संचारबंदीतही चोरट्यांची होतेय चांदी, हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:45 IST2020-04-05T11:45:02+5:302020-04-05T11:45:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीच्या काळात चोरट्यांनी हातसफाई सुरू ठेवली आहे. नंदुरबारातील गोडावून फोडून इलेक्ट्रीक सामान तर डाब, ...

The thieves were also involved in the ban on silver and silver, instead of thousands | संचारबंदीतही चोरट्यांची होतेय चांदी, हजारोंचा ऐवज लंपास

संचारबंदीतही चोरट्यांची होतेय चांदी, हजारोंचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदीच्या काळात चोरट्यांनी हातसफाई सुरू ठेवली आहे. नंदुरबारातील गोडावून फोडून इलेक्ट्रीक सामान तर डाब, ता.अक्कलकुवा येथे दुकान फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी नंदुरबार व मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदीमुळे सध्या सर्वत्र शुकशुकाड आहे. ही संधी साधत चोरटे हातसफाई करीत आहेत. नंदुरबारातील सुमित विजयकुमार गुरुबक्षाणी, रा.सिंधी कॉलनी यांच्या मंगळ बाजारातील इलेक्ट्रीक वस्तुंच्या गोडावूनमधून चोरट्यांनी ३५ हजारांचे साहित्य चोरून नेले. त्यात एलईडी बल्ब, ईस्त्री व बॅटरी यांचा समावेश आहे. लॉकडाऊनपासून हे गोडावून बंदच असल्यामुळे चोरी नेमकी कधी झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत सुमित विजयकुमार गुरुबक्षाणी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे.
दुसरी घटना डाबचा मौलीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावात दिलीप भामटा वसावे यांचे किराणा दुकान आहे. दुकानाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातून रोख ११ हजार रुपये व साडेसहा हजार रुपयांचे सोन्याचे दागीने असा ऐवज चोरून नेला.
सकाळी ही बाब लक्षात आल्यावर दिलीप वसावे यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार राजेश पाटील करीत आहे.

Web Title: The thieves were also involved in the ban on silver and silver, instead of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.