जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी केले फ्रीज, शेगडी व मिक्सर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:10+5:302021-08-27T04:33:10+5:30
पोलीस सूत्रांनुसार, उर्मिळामाळ येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी २५ ऑगस्ट रोजी चोरी केली. चोरट्यांनी शाळेच्या खोलीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून ...

जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी केले फ्रीज, शेगडी व मिक्सर लंपास
पोलीस सूत्रांनुसार, उर्मिळामाळ येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरट्यांनी २५ ऑगस्ट रोजी चोरी केली. चोरट्यांनी शाळेच्या खोलीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील फ्रीज, दोन शेगड्या व एक मिक्सर घेऊन पोबारा केला. त्यांची किंमत १६ हजार रुपये आहे.
सकाळी शिक्षक शाळेवर गेेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी डाब केंद्र शाळेच्या केंद्र प्रमुखांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसात फिर्याद दाखल केली. याबाबत शिक्षक भीमसिंग सेगजी गावीत यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार मनोहर कोळी करीत आहे.
दरम्यान, वारंवारच्या अशा घटनांमुळे जिल्हा परिषद शाळा शिक्षकांमध्ये नाराजीची भावना असून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.