नवापुरात चोरटय़ांनी दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:10 IST2019-11-21T12:10:16+5:302019-11-21T12:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून मुख्य रस्त्यावरील लाईट बाजार परिसरात काल रात्री चोरटय़ांनी साडी ...

Thieves robbed two shops in Navapur | नवापुरात चोरटय़ांनी दोन दुकाने फोडली

नवापुरात चोरटय़ांनी दोन दुकाने फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून मुख्य रस्त्यावरील लाईट बाजार परिसरात काल रात्री चोरटय़ांनी साडी व कापड विक्रीचे दुकान फोडुन सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. 
पोलीस सुत्रानुसार, लाईट बाजार परिसरात चोरटय़ांनी काल मध्यरात्री साडीचे दोन दुकान फोडले. दुल्हन साडी सेंटर आणि राधा राणी ड्रेस मटेरिअल व साडी सेंटरच्या शटरला लावलेल्या कुलुपाचे अँगल कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून गल्ल्यातील 40 हजार रोख आणि ब्रॅण्डेड कंपनीच्या पन्नास हजार रुपये किंमतीचे साड्या असे एकूण एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याने दुकान मालक मनोज माधवदास खिलवाणी यांनी नवापुर पोलीसात दाखल तक्रारीत म्हटले आहे.  त्यांच्याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दुल्हन साडी सेंटर या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र दुकानाच्या अग्रभागी काच बसवलेला असल्याने चोरटे आत प्रवेश करू शकले नाही. परिणामी तेथील नुकसान टळले. चार दिवसापूर्वी भर दिवसा गजबजलेल्या बसस्थानक परिसरातील एका दुकानातून एक लाख 60 हजार रुपये रोख रक्कम लंपास झाले होते. मित्रत्वातुन या रकमेच्या परताव्याची खात्री दिली गेल्याने या घटनेची पोलिसात नोंद नाही. त्याआधी वरिष्ठ महाविद्यालयातुन चार लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली. दोन दिवसाआधी वरिष्ठ महाविद्यालय जवळच एका रो हाऊस मधे राहणारे नेरकर नामक शिक्षकाच्या घरातुन भरदिवसा दुपारी अडीचच्या सुमारास चोरट्यांनी हाथ सफाई केली. सीसीटीव्ही फुटेजमधे ते चोरटे कैद झाल्याचे वृत्त आहे. या घटनांचा तपास लागत नाही तोवर मुख्य रस्त्यावर झालेल्या दुकान फोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक महाजन व हवालदार तनपुरे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.    
 

Web Title: Thieves robbed two shops in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.