तळोद्यात बँक फोडण्यात चोरटे अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:36 IST2020-06-15T12:36:44+5:302020-06-15T12:36:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरात एकाच रात्रीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सात दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस ...

The thieves failed to break the bank at the bottom | तळोद्यात बँक फोडण्यात चोरटे अयशस्वी

तळोद्यात बँक फोडण्यात चोरटे अयशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरात एकाच रात्रीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सात दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सर्व दुकाने चिनोदा रस्त्यावरील आहेत. एका गॅरेजमधून सहा हजार ३०० रुपये किमतीचे स्पेअर पार्ट लांबवले.
याबाबत वृत्त असे की, शहरातील चिनोदा रस्त्यावरील महाजन स्टील ट्रेडर्स, आदर्श आॅटोमोबाईल, दीपक सबमर्सिबल, महाकाली आॅटोपार्ट, स्वामी आॅटो, अंजना प्रोव्हीजन, वरद मेडिकल व महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह इतर दुकानांच्या शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. कचरा डेपोसमोरील महाजन स्टील ट्रेडर्स यांचे दोन गाळे दुकानाचे आहेत. त्यांच्या दोन्हीही दुकानाचे शटर सकाळपर्यंत उघडेच होते. काही दुकानांचे कुलूप तोडून आत चोरट्यांनी आत शिरकाव केला. यादरम्यान कोणत्याच दुकानात रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे राग व्यक्त करीत चोरट्यांनी आदर्श आॅटोमोबाईल या मोटारसायकल गॅरेजमधील सामान बाहेर फेकून दिला. तर गॅरेजमधील मोटारसायकलीचे स्पेअर पार्ट, आॅईल, मॅकव्हील व इतर साहित्य असा सहा हजार ३०० रुपयांचा सामान चोरट्यांनी लांबवला. काही समान दुकानासमोर फेकलेला आढळून आला. कचरा डेपोलगत असलेल्या अंजना प्रोव्हीजनचा लोखंडी दरवाजा वाकवण्यात आला होता. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु कुलूप तुटले नाही. दीपक सबमर्सिबल या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेराची दिशाही चोरट्यांनी वळवली. या सर्वच दुकानांची प्राथमिक पाहणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
तळोद्यातील पहिलीच घटना
तळोदा शहरात प्रथमच एकाच रस्त्यावरील एकाच रात्रीत सात ते आठ दुकाने व एक बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. यामुळे नागरिकांची मालमत्ता व संपत्ती सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु कुलूप तुटले नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील बँकेचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रथमच प्रयत्न केल्याची घटना घडली.
याबाबत नासीर पिरखा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार राजू वानखेडे हे करीत आहेत.

Web Title: The thieves failed to break the bank at the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.