वाहकाच्या खिशावर चोरटय़ाने मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:10 IST2019-11-01T21:10:40+5:302019-11-01T21:10:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या वाहकाच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची चोरी करणा:या चोरटय़ास शहर पोलीसांनी ...

वाहकाच्या खिशावर चोरटय़ाने मारला डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या वाहकाच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची चोरी करणा:या चोरटय़ास शहर पोलीसांनी अटक केली आह़े चोरटय़ाने बुधवारी मध्यरात्री वाहकाच्या खिसा कापून चोरी केली होती़
डहाणू बस आगाराचे वाहक राकेश दशरथ हिरे हे मंगळवारी सायंकाळी बस घेऊन नंदुरबार येथे आले होत़े दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खिशातून 15 हजार 180 रुपये रोख आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला होता़ त्यांनी ही माहिती आगारात दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े त्यांनी परिसरात चौकशी केली असता, तान्या मोहन अभंगे रा़ कंजरवाडा हा या भागात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ पोलीसांनी त्याचा शोध घेत गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले होत़े त्याच्याकडून पोलीसांनी 15 हजार रुपये ताब्यात घेत अटक केली़
याप्रकरणी वाहक राकेश हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित तान्या अभंगे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉस्टेबल ठाकरे करत आहेत़ तान्या यास पोलीसांनी न्यायालयात हजर केले होत़े