चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, चोरीचा माल मिळविण्यात मात्र होते कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:41+5:302021-08-21T04:35:41+5:30
नंदुरबार : चोरीच्या मोठ्या घटनांमधील तसेच साधा मोबाईल चोरीच्या घटनांमधील मुद्देमाल देखील नंदुरबार पोलिसांनी संबधितांना परत केला आहे. परंतु ...

चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, चोरीचा माल मिळविण्यात मात्र होते कसरत
नंदुरबार : चोरीच्या मोठ्या घटनांमधील तसेच साधा मोबाईल चोरीच्या घटनांमधील मुद्देमाल देखील नंदुरबार पोलिसांनी संबधितांना परत केला आहे. परंतु अनेक छोट्या चोऱ्यांमधील मुद्देमाल फिर्यादींना मिळत नसल्याची स्थिती आहे. त्याला कारण चोरटे त्या वस्तूंची विल्हेवाट लावून मोकळे होतात किंवा मुद्देमाल जप्त होण्यात अडचणी असतात.
कोरोना आणि लॅाकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता व्यवहार रुळावर येताच चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. गेल्या काही महिन्यात झालेल्या चोरीच्या, दरोड्याच्या घटनांमधील बहुतेक मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला आहे. याशिवाय दुचाकी आणि मोबाईल चोरीमधील मुद्देमाल देखील मूळ मालकांना परत करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
व्यापाऱ्यांकडून वसुली करून परत जाणाऱ्या व्यापाऱ्यास लुटल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे दडपण पोलिसांवर होते. तो गुन्हा उघडकीस येऊन संशयितांना अटकही करण्यात आली आहे. परंतु त्यातील काही रक्कम चोरट्यांनी खर्च केल्याने ती वसूल करण्याचे बाकी आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये फारसे काही हाती लागत नाही. परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दल आणि सायबर क्राईमच्या मदतीने चोरलेले ५० पेक्षा अधीक मोबाईल मूळ मालकांना परत मिळाले आहेत. आणखी ४० पेक्षा अधिक मोबाईल चोरट्यांकडून जप्त करून ते मूळ मालकांना परत केले जाणार आहेत.