ट्रकचालकासह दोघांना मारहाण करीत कापडाच्या गाठी पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:23+5:302021-08-21T04:35:23+5:30
नंदुरबार- गुजरातकडे जाणारा कापडाच्या गाठींच्या ट्रकला अडवून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या कापडाच्या गाठी चोरून नेल्याची घटना घडली. ट्रकमालकासह चालकाला मारहाण ...

ट्रकचालकासह दोघांना मारहाण करीत कापडाच्या गाठी पळविल्या
नंदुरबार- गुजरातकडे जाणारा कापडाच्या गाठींच्या ट्रकला अडवून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या कापडाच्या गाठी चोरून नेल्याची घटना घडली. ट्रकमालकासह चालकाला मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक संजय पाटील, रा.म्हसवे, ता.पारोळा हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये (क्रमांक एमएच १८-बीसी ७३४७) कापडाचे गाठी घेऊन गुजरातकडे जात होते. त्यांच्या सोबत ट्रकमालक किशोर पाटील हे देखील होेते. शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास नंदुरबार-निझर रस्त्यावर निर्जन ठिकाणी काही जणांनी येऊन ट्रक अडविला. संजय पाटील व किशोर पाटील यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर ट्रकमधील लाखो रुपयांच्या कापडाच्या गाठी चोरट्यांनी चोरून नेल्या. जखमी अवस्थेत चालक यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपअधीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पहाणी करून पोलिसांना तपासासंदर्भात सुचना दिल्या. दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नेमका कितीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याबाबत समजू शकले नाही.