There will be web casting from 37 centers in Navapur constituency | नवापुर मतदार संघात 37 केंद्रातून वेब कास्टींग होणार
नवापुर मतदार संघात 37 केंद्रातून वेब कास्टींग होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :नवापूर विधानसभा मतदार संघातील 37 मतदान केंद्र सुक्ष्म निरिक्षकाच्या नियंत्रणात ठेवण्यात येणार असुन त्या ठिकाणी मतदानाच्या कालावधीत छायाचित्रण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी दिली. 
सोमवारी होणा:या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असुन आवश्यक असलेली सर्व तयारक पूर्ण झाल्याचे शेलार यांनी सांगितले. संवादनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 37 मतदान केंद्रांवर  होणार्या मतदानाचे छायाचित्रीकरण थेट निवडणूक आयोगाशी जोडण्यात आले आहे. तेथे अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे तर संवेदनशिल इतर 26 केंद्रांवर सुक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही महेश शेलार यांनी दिली.
 


Web Title: There will be web casting from 37 centers in Navapur constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.