पाच रस्त्यांवर खुल्या व्यायामशाळा होणार

By Admin | Updated: June 23, 2017 13:02 IST2017-06-23T13:02:22+5:302017-06-23T13:02:22+5:30

चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती : रविवारी वॉटर पार्कचे लोकार्पण

There will be open gym in five roads | पाच रस्त्यांवर खुल्या व्यायामशाळा होणार

पाच रस्त्यांवर खुल्या व्यायामशाळा होणार

>ऑनलाईन लोकमत न्यूज 
नंदुरबार, दि.23 : पालिकेतर्फे शहरातील पाच रस्त्यांवर मोफत खुल्या व्यायामशाळा साकारणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली़ शहरातील सीबी गार्डन व वॉटरपार्कच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली़ 
नंदुरबार पालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या वॉटर पार्कचा लोकार्पण सोहळा 25 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आह़े या कार्यक्रमाची तसेच वॉटरपार्कची माहिती आमदार रघुवंशी यांनी दिली़ यावेळी त्यांनी सांगितले की, नंदुरबार पालिकेने पिण्याचे मुबलक पाणी, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, डिपीरोड या माध्यमातून विकास सुरू आह़े शहरात वॉटरपार्क असावा, अशी अपेक्षा नागरिकांची होती़ त्यानुसार पालिकेच्या जमिनीवर बीओटी तत्त्वावर सव्वा चार कोटी रूपये खर्चाचे वॉटर पार्क उभारले आह़े याच जमिनीवर मॅरेज लॉन आणि गार्डन उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली़ याठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी म्युङिाकल फाउंटन, लहान मुलांसाठी खेळणे यासह विविध साधने आहेत़ या वॉटर पार्कचे उद्घाटन रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: There will be open gym in five roads