There was a huge drop in the price of herbs | औषधी वनस्पतींच्या किमतीत झाली मोठी घट
औषधी वनस्पतींच्या किमतीत झाली मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी वनस्पतींवर उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्केपेक्षा अधिक किमती घटल्यामुळे नागरिकांचा उदरनिर्वाह संकटात सापडला आहे.
धडगाव व मोलगी भागात बागायती शेतींचा अभाव आहे, त्यातच सिंचनायोग्य पाऱ्याची कुठलीही सुविधा नसल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डोंगर-उतार, दगड-गोट्यांच्या शेतजमिनी असल्यामुळे शेतातील उत्पादन अत्यल्प असते. त्या उत्पन्नावर कुठल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. वर्षभराच्या पोटापाण्यासाठी प्रत्येक कुटुंबांकडून किरकोळ पिके, स्थलांतरीत मजूरी व राना-वनातील औषधी वनस्पतींवर अवलंबून राहावे लागत आहे.
यंदा खरीप हंगामातील किरकोळ शेतीची कामे आटोपून काही नागरिक रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलातरीत झाले आहेत. तर मुळगावी थांबलेल्या नागरिकांकडून पावसाळ्याच्या कालावधीत रानावनात उगलेल्या औषधी वनस्पती, त्यांच्या बिया, पाला, मुळे, साली, फुले गोळा करण्यात येत आहे. हे सर्व घटक औषधे निर्मितीसाठी वापरले जात असल्याचे धडगाव व मोलगी बाजारपेठेतील व्यापाºयांमार्फत सांगण्यात येते. आयुर्वेद तथा आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वच घटक मोलाचे ठरतात. परंतु यंदाच्या हंगामात त्यांना दोन्ही बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
दुर्गम भागात गोळा केले जाणाºया कुठल्याच औषधी वनस्पतींना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे या वनस्पींवर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांचे आर्थिक गणित चुकत आहे. वर्षभरासाठी याच कालावधीत नियोजन केल्यास वर्षभर पोटापाण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु या वनस्पींपासून मिळणाºया उत्पदनालाच योग्य भाव मिळत नसल्याने कुटुंबच संकटात सापडले असल्याचे म्हटले जात आहे.

४दुर्गम भागात कडू जिरा याची वनस्पती देखील आढळून येत आहे. ही वनस्पती राना-वनाचत नव्हे तर काही शेतकºयांकडून त्यांची शेतातही लागवड करण्यात येत आहे. या नवस्पतीपासून मिळणाºया मालाला मागील वर्षी २५० रुपये प्रतीकिलो भाव दिला जात होता. याच उत्पादनाला यंदा केवळ ६० रुपये प्रतीकिलोला भाव दिला जात आहे. त्यामुळे यात ७४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादकाच्या नाकी नऊ येत आहे.
४धडगाव व मोलगी येथील व्यापाºयांमार्फत खरेदी करण्यात येणारी औषधी वनस्पती ही प्रामुख्याने इंदैरच्या बाजारपेठेत पाठवली जात आहे. तेथून भारतभरातील औषधी कंपन्यांमार्फत खरेदी केली जात आहे.

Web Title: There was a huge drop in the price of herbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.