लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना आपण भेटलो नाही आणि मुक्ताईनगरही गेले नाही अशी स्पष्टोक्ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी दिली आहे.भाजपचे नेते खडसे यांच्या राष्ट्रवादी कॅांग्रेस प्रवेशाबाबतची चर्चा सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांचेही नाव प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात सीमा वळवी यांनी सांगितले की, मंगळवारी आपण दिवसभर नंदुरबार जिल्ह्यातच आपल्या कामात होती. त्यामुळे मुक्ताईनगरला जाण्याचा प्रश्नच नाही. आपण कॅांग्रेस पक्षात असून एकनाथ खडसे यांना भेटण्याचा प्रश्नही उदभवत नाही. आपले नेते केवळ पालकमंत्री के.सी.पाडवी व ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी हेच आहेत. या ज्येष्ठ नेत्यांव्यतिरिक्त राजकारणासंदर्भात आपण कोणाशी भेटले नाही. त्यामुळे प्रसिद्ध झालेले वृत्त हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
खडसे यांना भेटण्याचा प्रश्नच नाही- सीमा वळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:59 IST