आर्डीतारा येथे चोरटय़ांकडून 55 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:11 IST2019-06-02T12:11:52+5:302019-06-02T12:11:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरात घुसून दोघांनी 54 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आर्डीतारा, ता.नंदुरबार येथे ...

There are 55 thousand rupees worth of looters from the thieves in Orderera | आर्डीतारा येथे चोरटय़ांकडून 55 हजारांचा ऐवज लंपास

आर्डीतारा येथे चोरटय़ांकडून 55 हजारांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरात घुसून दोघांनी 54 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आर्डीतारा, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आर्डीतारा येथील पाच्या रुतमा वळवी यांच्या घरात 31 रोजी दोन अज्ञात व्यक्ती घुसले. त्यांनी लोखंडी कपाटाला लावलेल्या चाव्या अलगद काढून कपाटातील तिजोरीतून ऐवज चोरून नेला. त्यात सोने, चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असा एकुण  54 हजार 800 रुपयांचा ऐवज होता. वळवी यांच्या लक्षात ही बाब आली. घरात दोन व्यक्ती घुसल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ही हातसफाई केल्याचा संशय घेत पाच्या वळवी यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्याद दाखल करून घेतली. वळवी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वळवी करीत आहे. 
दरम्यान, दोघे चोरटे गावातील की गावाबाहेर याबाबत पोलीस शोध घेत आहेत. घराची माहिती असलेल्या व्यक्तींकडूनच ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांचा आहे.
 

Web Title: There are 55 thousand rupees worth of looters from the thieves in Orderera