....तर जिल्ह्यातील ९० टक्के शाळा येत्या काळात सुरू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:14+5:302021-06-29T04:21:14+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील ९५ टक्के गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. पाचपैकी एक तालुका आधीच कोरोनामुक्त झाला असून ॲक्टिव्ह रुग्णांची ...

....तर जिल्ह्यातील ९० टक्के शाळा येत्या काळात सुरू होण्याची शक्यता
नंदुरबार : जिल्ह्यातील ९५ टक्के गावे ही कोरोनामुक्त झाली आहेत. पाचपैकी एक तालुका आधीच कोरोनामुक्त झाला असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याने मृत्यूदर खालावला आहे. कोरोना असाच नियंत्रणात राहिल्यास शाळांचा सुरू होण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
कोरोनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावी दरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्या हाेत्या. यानंतर डेल्टा प्लसच्या संसर्गानंतर त्यांनी निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काही जिल्ह्यात कोरोना संसर्ग ९५ टक्के आटोक्यात आला आहे. जिल्हा शिक्षण विभागाने याचा आढावाही घेतला आहे. जिल्ह्याचा पाॅॅझिटिव्हिटी रेट हा कमी असल्याने येत्या काळात शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मे महिन्यात २७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त होत्या तर जूनमध्ये हा आकडा ५५५ एवढा झाला आहे. यात धडगाव तालुका कोरोनामुक्त आहे.
माहितीचे संकलन
नंदुरबार माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी मच्छिंद्र कदम तर प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून डाॅ. राहुल चाैधरी हे काम पाहतात. दोघांकडून माहितीचे वेळोवेळी संकलन करून माहिती जिल्हा प्रशासनाकडे दिली जात आहे.