नवापूर येथून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:28+5:302021-07-20T04:21:28+5:30
वाहनचालकांवर कारवाई नंदुरबार : अक्कलकुवा शहरात अपघात घडण्याची स्थिती निर्माण करत एमएच ४६ एयू ०३३१ हे वाहन भरधाव वेगात ...

नवापूर येथून दुचाकीची चोरी
वाहनचालकांवर कारवाई
नंदुरबार : अक्कलकुवा शहरात अपघात घडण्याची स्थिती निर्माण करत एमएच ४६ एयू ०३३१ हे वाहन भरधाव वेगात चालवल्याप्रकरणी मंगेश मोसा राऊत रा.साकळीउमर भिमसिंग नवल्या नाइर्क रा. खुर्चीमाळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. तळोदा नाक्यावर दोघांवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमरसिंग पाडवी व संदीप महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रामचंद्र मोहने करत आहेत.
वाहतूकीस अडथळा
नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर मोलगी नाका भागात जीजे २२ यू ०८२० ही तीन चाकी रिक्षा लावून वाहतूकीस अडथळा केल्याप्रकरणी राजेंद्र कापसिंग गावीत रा. देवमोगरा पुनर्वसन ता. अक्कलकुवा याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याविराेधात पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रामचंद्र मोहने करत आहेत.