नवापुरात व्यापाऱ्याच्या सहा क्विंटल ‘कांद्या’ची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:46 IST2019-12-18T11:46:18+5:302019-12-18T11:46:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील व्यापाºयाचे सहा क्विंटल कांदे आणि ५२ किलो बटाटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना ...

नवापुरात व्यापाऱ्याच्या सहा क्विंटल ‘कांद्या’ची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील व्यापाºयाचे सहा क्विंटल कांदे आणि ५२ किलो बटाटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली़ या घटनेनंतर व्यापाºयाने पोलीसात धाव घेत चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे़
नवापुरातील इमरान अत्तरखान पठाण यांचा नवाहोंडा गावाच्या पुलाजवळील मार्केटमध्ये कांदा व बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे़ १३ डिसेंबर रोजी त्यांनी येथील मोकळ्या जागेत प्रत्येकी ५० क्विंटल वजनाच्या सहा गोण्या कांदा व ५२ किलो बटाटे भरलेली गोणी ठेवली होती़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास ३२ हजार रुपयांच्या १२ कांदा गोण्या व १ हजार ५० रुपयांची बटाटा गोणी अज्ञात चोरट्यांनी उचलून नेली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर इमरान पठाण यांनी ‘कांदे व बटाटे’ चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज नवापुर पोलीस ठाण्यात सादर केला होता़ या अर्जाची दखल घेत सोमवारी रात्री उशिरा पोलीसांनी कारवाई केली़
याबाबत इमरान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली होती़ घटनेमुळे नवापुर शहरात एकच खळबळ उडाली असून भरदुपारी मार्केट परिसरात ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ नवापुर शहरात अनेक व्यापाऱ्यांचा माल उघड्यावर ठेवला जातो़ याठिकाणी चोरट्यांचा संचार वाढून कांदे बटाटे चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाºयांनी चिंता व्यक्त केली आहे़