शेल्टी येथे चोरटय़ांकडून तोडफोड करुन मोटारींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:27 IST2019-06-18T21:27:36+5:302019-06-18T21:27:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेल्टी ता़ शहादा शिवारात तापी नदीपात्रातील शेतातून अज्ञात चोरटय़ांनी पाणमोटारी चोरुन नेल्याचा प्रकार 16 ...

शेल्टी येथे चोरटय़ांकडून तोडफोड करुन मोटारींची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेल्टी ता़ शहादा शिवारात तापी नदीपात्रातील शेतातून अज्ञात चोरटय़ांनी पाणमोटारी चोरुन नेल्याचा प्रकार 16 जून रोजी रात्री आठ वाजता उघडकीस आला़ चोरीदरम्यान चोरटय़ांनी येथे तोडफोड करुन नुकसान केल़े
शेल्टी येथील भरत सुदाम पाटील यांच्यासह शेतकरी रविवारी रात्री आठ वाजता शेताकडे गेले होत़े यावेळी शेतात अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े त्यांनी इतर शेतक:यांना याची माहिती दिली़ शेतकरी आल्याचे दिसून आल्यानंतर चोरटय़ांनी शेतीसाहित्याची नासधूस करत तापी नदी काठावर ठेवलेल्या 15 हजार 500 रुपये किमतीच्या पाणी ओढणा:या ईलेक्ट्रीक मोटारी चोरुन नेल्या़ शेतक:यांनी पाठलाग करुनही चोरटे हाती लागले नाहीत़ या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून कारवाईची मागणी आह़े
याबाबत भरत सुदाम पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बागले करत आहेत़