नवापुरात मोबाईल दुकानातून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:27 IST2019-09-05T12:26:56+5:302019-09-05T12:27:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या मेनरोडवरील  मोबाईल दुकानात शटर तोडून दोन लाख रूपये किमतीचे ...

Theft from a mobile shop in Navapur | नवापुरात मोबाईल दुकानातून चोरी

नवापुरात मोबाईल दुकानातून चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या मेनरोडवरील  मोबाईल दुकानात शटर तोडून दोन लाख रूपये किमतीचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरटय़ांनी लांबविले आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमे:यामध्ये कैद झाले असून, दुकानात जवळ जवळ दोन लाख रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे मालक इकबाल शेख यानी सांगितले असून, नवापुर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बाजारपेठेत वाहतुकीच्या भररस्त्यावर झालेल्या चोरीने व्यापा:यांमध्ये घबराटीचे वातावरण असून, रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलीस ठाण्यासमोरच गाडीचा काच फोडून चोरी 
नवापुर शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, 24 तासाच्या आत दूसरी धाडसी चोरी झाली. नवापूर पोलीस ठाण्यासमोरच भर दिवसा गाडीचा काच फोडून चोरीची घटना घडली.
जागृत नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेने चोराला अटक  झाली आहे. चोरटा अल्पवयीन व परप्रांतीय असल्याचे समजते.
नवापूर तहसील आवारात उभ्या असलेल्या चारचाकीचा काच फोडून पैसे असलेली बेग चोरून पळत असलेल्या चोराला जागृत नागरिकांनी आरडा ओरड केल्याने जागीच असलेल्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. करंजाळी येथील सरपंच किसन वळवी आपल्या कामानिमित्त स्टेट बँकेतून तहसील कार्यालय आवारात आले असता आपल्या मालकीची गाडी पार्क करून अपाले काम आटोपत होते.  
पोलीस ठाण्याच्या आवारात जमाव बघून आपल्या गाडी जवळ आल्यावर ड्रायव्हर साइडचा काच फोडलेला दिसला. पोलिसांनी पकडूून आणलेल्या चोरटय़ांकडे असलेली बॅग आपली असल्याची खात्री केली व  नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ.दादा वाघ व योगेश्वर तनपुरे तपास करत आहे.
 

Web Title: Theft from a mobile shop in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.