शहाद्यात दुकान फोडून सव्वा लाखाचे इलेक्ट्रीक साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:20 IST2019-09-21T12:20:11+5:302019-09-21T12:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील भाजीमंडी भागात ईलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान फोडून अज्ञात चोरटय़ांनी सव्वा लाख रुपयांचा ...

शहाद्यात दुकान फोडून सव्वा लाखाचे इलेक्ट्रीक साहित्याची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील भाजीमंडी भागात ईलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान फोडून अज्ञात चोरटय़ांनी सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला़
भाजीमंडी भागातील इंदिरा मार्केटमध्ये जमिल हुसमोद्दीन मन्सूरी यांच्या मालकीच्या इलेक्ट्रीक सामान विक्रीच्या दुकानाचे शटर तोडून चोरटय़ांनी 30 हजार 600 रुपयांची केबल वाय, 27 हजार रुपयांचे स्टार्टर, 12 हजार रुपयांची सव्र्हिस मीटर वायर यासह पाण्याच्या मोटारी आणि नादुरुस्त पंखे असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेल़े मंगळवारी रात्री 9 ते बुधवारी सकाळी आठ यादरम्यान ही घटना घडल्याची माहिती आह़े
याप्रकरणी जमिल मन्सूरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सरदार करत आहेत़