खुशगव्हाण शिवारातील घरातून रोख रक्कम चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:02 IST2020-11-12T13:01:31+5:302020-11-12T13:02:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातील घरात ठेवलेले साेन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास झाल्याची घटना तालुक्यातील खुशगव्हाण ...

खुशगव्हाण शिवारातील घरातून रोख रक्कम चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शेतातील घरात ठेवलेले साेन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास झाल्याची घटना तालुक्यातील खुशगव्हाण शिवारात घडली. याप्रकरणी तळाेदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुशगव्हाण येथील देवेंद्र यशवंत पाडवी यांचे याच शिवारात शेत आहे. याठिकाणी त्यांचे घर आहे. १३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून ४६ हजार रूपये रोख व साडेतेरा हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. रात्री घरातील सर्व जण झोपले असताना चोरट्याने हा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. शेतकरी देवेंद्र पाडवी यांनी दोन दिवसांपूर्वी सोयाबीन व कापूस विकून त्यापोटी मिळालेले ४६ हजार रूपये रोख घरात ठेवले होते. ही माहिती चोरट्याला असल्याने त्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत रोख रकमेसह मंगलपोत चोरुन नेली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पाडवी कुटूंबिय हताश झाले होते.
याप्रकरणी देवेंद्र पाडवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत. घटनेमुळे खळबळ उडाली चोरटा हा परिसरातील असावा असा अंदाज आहे.