शहाद्यात मेडिकल दुकानातून रोख रक्कम व साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:50 IST2020-05-04T12:50:48+5:302020-05-04T12:50:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. याचाच फायदा घेत ...

शहाद्यात मेडिकल दुकानातून रोख रक्कम व साहित्याची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. याचाच फायदा घेत चोरटे सक्रीय झाल्याचे दिसत आहे. स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मेडीकल व जनरल स्टोअर्स दुकान फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह साहित्य लंपास केल्याची घटना घडली.
शहरातील पटेल रेसिडेन्सीकडून स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाºया मुख्य मार्गावरील शॉपिंगमध्ये मिलिंद पाटील यांच्या मालकीचे डीनल मेडीकल व जनरल स्टोअर्स दुकान आहे. हे दुकान गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वरील पत्रे तोडून आत प्रवेश करीत आठ हजार रुपये रोख व दुकानातील सामान चोरट्यांनी लंपास केला. तसेच दुकानातील इतर साहित्याचेही नुकसान केले. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडताना चोरी झाल्याचे कळताच दुकान मालक मिलिंद पुरुषोत्तम पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकान मालकाने सुरक्षेच्या कारणास्तव दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. मात्र चोरत्याने पत्रे उचकवून दुकानात प्रवेश केल्याने त्याने सीसीटीव्हीच्या पिना काढल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊन काळात चोरटे सक्रीय झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दुकानांमध्ये लहान-मोठ्या चोºया होत आहेत. मात्र दुकानदार तक्रार देण्याकडे कानाडोळा करतात. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.