धुरखेडा शिवारातून केबलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST2021-09-13T04:28:40+5:302021-09-13T04:28:40+5:30

याबाबत वृत्त असे की, धुरखेडा, ता. शहादा येथील शेतकऱ्यांची शेती भादा, काथर्दे, धुरखेडा, प्रकाशा शिवारात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच ...

Theft of cable from Dhurkheda Shivara | धुरखेडा शिवारातून केबलची चोरी

धुरखेडा शिवारातून केबलची चोरी

याबाबत वृत्त असे की, धुरखेडा, ता. शहादा येथील शेतकऱ्यांची शेती भादा, काथर्दे, धुरखेडा, प्रकाशा शिवारात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच रात्री मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात चोरट्यांनी चोरी करून नुकसान केले आहे. राजेंद्र शंकर चौधरी, शरद मधुकर चौधरी, सुदाम मगन चौधरी, अरविंद दत्तू पाटील, उद्धव सोमजी चौधरी, भरत छगन पाटील, दिलीप रोहिदास चौधरी, युवराज राजाराम चौधरी, पांडुरंग मदन चौधरी यांच्यासह इतर सुमारे १५ शेतकऱ्यांच्या शेतातील कूपनलिकेतील वायर तोडून नेली, मीटरपेटी मीटरसह चोरून नेली. कूपनलिकेवरील झब्बे काढून नेताना कूपनलिकेतील मोटारपंपही आत सोडून देण्यात आला. चोर मोठ्या संख्येत असल्याने शेतातील कोवळे पीकही पायदळी तुडवले गेले आहे. पाईप, एल्बो, नळ्या चोरून नेल्या असून मोठे नुकसान केले आहे. कूपनलिकेत मोटारपंप सोडल्याने दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. दर दोन महिन्यांनी चोरीच्या घटना घडत असतात. पोलिसांत कळवले तर काहीच होत नाही, परिणामी शेतकरी हताश झाले आहेत. मात्र चोरांनी एकाच रात्रीतून २० ते २५ शेतात चोऱ्या करून पोलिसांना आव्हानच दिले आहे. पोलिसांनी चोरांसह चोरीचा माल भंगारात विकत घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी धुरखेडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Theft of cable from Dhurkheda Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.