नंदुरबारात महिलेच्या पर्ससह ८१ हजारांचा ऐवज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:42 IST2019-02-28T11:42:32+5:302019-02-28T11:42:58+5:30
नंदुरबार : बाजारातून जात असतांना महिलेची पर्स व त्यातील ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळ बाजारातील मराठा ...

नंदुरबारात महिलेच्या पर्ससह ८१ हजारांचा ऐवज चोरीस
नंदुरबार : बाजारातून जात असतांना महिलेची पर्स व त्यातील ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळ बाजारातील मराठा गल्लीत घडली.
तळोदा येथील नम्रता चंद्रकांत कलाल या नंदुरबारातील मंगळ बाजारातील मराठा गल्ली परिसरात बाजाराच्या दिवशी खरेदी करीत होतत्या. गर्दीची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्याकडील पर्स लांबविली. पर्समध्ये तीन हजार रुपये रोख, ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व तीन हजार रुपयांचा मोबाईल असा ८१ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आले नाही. नम्रता कलाल यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.