राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:44 IST2020-10-12T12:44:13+5:302020-10-12T12:44:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अशा उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अशा उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी सत्यजित सिसोदे यांनी नंदुरबार येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शहरातील सेंट मदर टेरेसा स्कूलच्या प्रांगणात पक्षाचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाकीरमिया जहागिरदार, शांतीलाल साळी, नितीन पाडवी, यूनूस पठाण, मोहन रायभान माळी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र वाघ, सुरेंद्र कुवर, बी.के.पाडवी, अॅड. अश्विनी जोशी, पुष्पा गावीत, एन.डी.पाटील, डी.व्ही.मोरे, रफिक मुसळदे, दिनेश पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. बैठकीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर यावेळी चर्चा केली. शिसोदे यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा घेत मते जाणून घेण्यात आली. प्रसंगी मार्गदर्शन करताना सत्याजित शिसोदे यांनी पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्यात यावी असे सांगून ग्रामीण भागात काम वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदासाठी तिघांनी मुलाखत दिल्याची माहिती आहे. यातील दोघांची चाचपणी करण्यात आली असून येत्या काळात दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मेळाव्यात युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान दुपारी शासकीय विश्रामगृहात सत्यजित शिसोदे य्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी, जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता शितोळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, योगेश पाटील, तोरणमाळचे माजी सरपंच सिताराम पावरा, मोहन शेवाळे, रवी सोनवणे, सूरज गावीत, गौरव गावीत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टिन्सिंग पाळून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीतही शिसोदे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत माहिती जाणून घेतली.