टेंभली जि.प. शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने साकारले डिजीटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:45 IST2019-07-28T12:45:14+5:302019-07-28T12:45:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : टेंभली, ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विद्याथ्र्याची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून ...

Tenvli ZP School teachers self-funded digital classes | टेंभली जि.प. शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने साकारले डिजीटल वर्ग

टेंभली जि.प. शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने साकारले डिजीटल वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : टेंभली, ता.शहादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विद्याथ्र्याची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून अध्यापन आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्वखर्चाने शाळेत डिजीटल वर्गाची निर्मिती केली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकवर्गणीतून शाळांमध्ये डिजीटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. काही शाळातील शिक्षकांनीच वर्गणी करून हे वर्ग निर्माण केले आहेत. टेंभली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पटेल व  शिक्षकांनीही मुलांना मनोरंजनातून अध्यापन आणि शिक्षणाची गोडी लावण्यासाठी स्वखर्चाने दोन डिजिटल वर्ग तयार केले. यापूर्वी या शाळेत दोन वर्ग डिजीटल आहेत. आता उर्वरित वर्गही डिजीटल झाल्याने शाळा 100 टक्के डिजिटल झाली आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना शाळेची गोडी वाढू लागली. त्यात स्वखर्चाने साऊंड सिस्टिम आणल्याने मुलांना अभ्यासक्रम मनोरंजनात्मक वाटू लागला आहे. शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून 100 च्यावर पटसंख्या आहे. मुख्याध्यापिका रेखा पटेल, शिक्षक विलास भोई, विवेक विसपुते, नाना कोळी, प्रकाश लांबोळे, सीमा खैरनार आदींच्या सहकार्याने शाळा पूर्ण डिजिटल झाली आहे.
दरम्यान, संपूर्ण शाळा डिजिटल करून विद्याथ्र्याना शाळेविषयी गोडी निर्माण केल्याने मुख्याध्यापिका रेखा पटेल व सहकारी शिक्षकांचा केंद्रसंमेलनात शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Tenvli ZP School teachers self-funded digital classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.