शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहने अडविण्याच्या वादातून लोणखेडय़ात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसात साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवसात साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर प्रकाशा येथे अडविण्यात आलेली वाहने सोडण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा अनेक भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यानी ऊस भरलेली वाहने अडवून आंदोलने केले. याच वादातून लोणखेडा चौफुली येथे वादविवाद होऊन वातावरण चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतक:यांना 2700 रुपये प्रतीटन भाव मिळावा, मागील थकबाकीची रक्कम एकरकमी मिळावी यासह इतर विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारपासून ऊसतोड बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी प्रकाशा येथे सातपुडा साखर कारखाना व समशेरपूर साखर कारखाना येथे जाणारे ऊस भरलेली वाहने अडवून आंदोलन केले होते. आणि जो पयर्ंत मागील वर्षाची थकीत ऊसाची रक्कम शेतक:यांच्या खात्यात जमा करत नाही व चालू गळीत हंगामात ऊसाला 2700 रुपये भाव दिला जात नाही तोपयर्ंत वाहने न सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. रात्री  शहादाचे पोलिस निरीक्षक संजय शुक्ल आंदोलन स्थळी आले. आंदोलनकत्यार्शी त्यांनी चर्चा करुन वरिष्ठाशी समेट घडविण्याचा प्रय} केला. जिल्हाधिका:यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी येत्या दोन दिवसात साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व साखर कारखान्याचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे ऊसाने भरलेले 50 पेक्षा अधीक वाहने रात्री उशिरा सोडण्यात आले. जोर्पयत तोडगा निघत नाही, मागण्या मान्य होत नाहीत तोर्पयत ऊसतोड बंद आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार कायम ठेवण्यात आला.मंगळवारी देखील अनेक भागात संघटनेच्या कार्यकत्र्यानी ऊस भरलेली वाहने अडवून ठेवली. यामुळे कारखान्यांना गाळपासाठी ऊसाची चणचण भासू लागली. लोणखेडय़ात वादलोणखेडा, ता.शहादा येथील चौफुलीवर वाहन अडविण्याचा प्रय} करण्यात आला असता तेथे कारखाना पदाधिकारी आणि संघटनेच्या पदाधिका:यांमध्ये वादविवाद झाला. प्रचंड गर्दी जमा झाली होती. रहदारी देखील ठप्प झाली होती. संघटना पदाधिकारी आणि कारखाना पदाधिकारी यावेळी समोरासमोर ठाकले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ  टळला. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहादा पोलीस ठाण्याकडे रवाना झाले होते.लोणेखडा चौफुलीवर ऊस वाहतूकीच्या अडविलेल्या वाहनाजवळ गेलो असता तेथे कारखाना चेअरमन दीपक पाटील, नगरसेवक मकरंद नगीन पाटील, अशोक टिला पाटील यांनी आपल्याला व संघटनेचे कार्याध्यक्ष नथ्थू रोहीदास पाटील यांना बेदम मारहाण केली. मोबाईल व सोन्याची साखळीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशीरार्पयत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ऊसतोड बंद झाल्याने मजुरांना देखील घरी बसून राहावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.संघटनेच्या आंदोलनाच्या पाश्र्वभुमीवर ऐन दिवाळीत जिल्हाभरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.