नंदुरबारात गुटख्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:45 IST2020-12-13T21:45:50+5:302020-12-13T21:45:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील रामचंद्रनगर भागातील गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा व व्हॅन असा एकुण दहा लाखांचा मुद्देमाल एलसीबीने ...

नंदुरबारात गुटख्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील रामचंद्रनगर भागातील गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा व व्हॅन असा एकुण दहा लाखांचा मुद्देमाल एलसीबीने छापा टाकून जप्त केला. सिंधी कॅालनीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम गगनदास धनवाणी, रा.सिंधी कॅालनी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, शहरातील रामचंद्र नगर भागात अवैध गुटखा साठवलेला असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत यांनी पथक पाठवून धाड टाकली. तेेथे एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तपासणी केली असता त्यात गोडावून व व्हॅनमध्ये विमल पान मसाल्याचे १४ खोके पोते, सुगंधी तंबाखू प्रत्येकी २०८ पाकिटांची १४ पोते. तानसेन सुपारीचे चार पोते, रजनीगंधाचे २०० पाकिटे यासह इतर गुटखा पाकिटे व व्हॅन असा एकुण १० लाख पाच हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ओम धनावनी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, आनंदा मराठे, अभय राजपूत, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.