दहा दिवसांच्या अंतरात दोघा भावांच्या निधनाने हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST2021-04-19T04:27:30+5:302021-04-19T04:27:30+5:30

येथील विसरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष दलपत चौधरी यांचे लहान भाऊ हरीश दलपत चौधरी (वय ४२) यांचे दि. ९ ...

Ten days apart, two brothers died | दहा दिवसांच्या अंतरात दोघा भावांच्या निधनाने हळहळ

दहा दिवसांच्या अंतरात दोघा भावांच्या निधनाने हळहळ

येथील विसरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष दलपत चौधरी यांचे लहान भाऊ हरीश दलपत चौधरी (वय ४२) यांचे दि. ९ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. लहान भावाचे उत्तरकार्य होत नाही, त्याच्या आधीच त्यांचे मधले भाऊ राजेंद्र दलपत चौधरी (४७) यांचे रविवारी दि. १८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने उपचार घेत असताना निधन झाले.

अवघ्या दहा दिवसांच्या अंतरावर दोन भावांचे निधन झाल्याने चौधरी कुटुंबीयांस फार मोठा धक्का बसला आहे. विसरवाडी येथे या दोन भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत राजेंद्र चौधरी विसरवाडी ग्रामीण सहकारी पतसंस्थेत अल्पबचत एजंट म्हणून कार्यरत होते. राजेंद्र चौधरी हे मनमिळावू स्वभावाचे व सर्वांमध्ये प्रेमभावना जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ten days apart, two brothers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.