सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४२ अंशावर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:15 IST2019-05-21T12:15:38+5:302019-05-21T12:15:50+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे़ १९ ते २५ मेपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा ...

सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४२ अंशावर कायम
नंदुरबार : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे़ १९ ते २५ मेपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे़ रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस कमाल तापमान ४२ अशांवर कायम होते़
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड प्रमाणात बेहाल झालेले आहेत़ दुपारच्या वेळी अक्षरश: उष्ण लहरींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे़ दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास नंदुरबारचे तापमान ४२ अंशापर्यंत गेले होते़ ५ वाजेपर्यंत तापमान ४१ अंशापर्यंत कायम होते़ तर सायंकाळी सहा वाजता तापमान ३९ अशांवर होते़ दरम्यान, रात्री १० वाजेपर्यंत उन्हाच्या झळा बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ दरम्यान, शहादा तालुक्यातदेखील वाढत्या उष्णतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत़