नंदुरबारातील तापमान चाळीशी खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:36 IST2019-04-08T11:35:48+5:302019-04-08T11:36:09+5:30
दिलासा : ताशी २२ किमी गतीने वाहताय वारे, धुळीची समस्या निर्माण होणार

नंदुरबारातील तापमान चाळीशी खाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारात सध्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे़ शनिवार व रविवारी साधारणत: ताशी १८ ते २२ किमी गतीने वारे वाहत होते़ पुढील एक ते दोन दिवस वाऱ्यांचा असाच प्रभाव कायम राहणार आहे़ एकीकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत असताना तापमान चाळीशीच्या खाली गेलेले दिसून आले़ शनिवारी ३९ तर रविवारी ३९.८ इतके कमाल तापमानाची नोंद झाली़
नंदुरबारातील तापमानाात किंचित घट बघायला मिळत आहे़ आठवड्यापूर्वी तब्बल ४२ अंशाच्या घरात गेलेले कमाल तापमान दोन दिवसांपासून ३९ अंशावर स्थिर आहे़ त्यामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत आहे़ परंतु ही स्थिती फार काळ राहणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़
उत्तरेकडील जम्मू-काश्मीर परिसरात दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे़ तो हळूहळू पुर्वेकडे सरकत आहे़ त्यामुळे भारताच्या पूर्व भागापासून ते दक्षिणेपर्यंत ट्रफ रेषा तयार झालेली आहे़ या ट्रफ रेषेत बराचसा विदर्भ व मराठवाड्याचाही भाग आलेला आहे़ त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे़ अशा वातावरणीय बदलामुळे राज्यभरात वाºयांच्या वेगात वाढ झालेली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ नंदुरबारात ताशी १८ ते २२ किमी वेगाने वारे वाहत असल्याने तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळत आहे़ एक ते दोन दिवस वाºयांचा वेग कायम राहून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे़
ग्रामीण भागात धुळीची समस्या
शहरी भागासह ग्रामीण भागात वेगवान वारे वाहत असल्याने शेतकºयांच्या आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे तळोद्यातील शेतकºयांकडून सांगण्यात आले़ त्याच प्रमाणे ग्रामीण भागात कच्चे रस्ते असल्याने अशा ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झालेली होती़
राजस्थानात उष्ण लहरी
दरम्यान, सध्या राजस्थान, कच्छ, सौराष्ट आदी भागांमध्ये उष्ण वाºयांचा प्रभाव निर्माण झालेला आहे़ आठवड्यापूर्वी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेला हा प्रभाव काहिसा ओसरलेला दिसून येत आहे़ मराठवाडा, विदर्भ तसेच पूर्वीकडील ‘सेव्हन सिस्टर’ राज्यांमध्ये निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे राज्यातील काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे़
दरम्यान काही दिवसातच पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत़ सध्या वातावरणात २५ ते ३० टक्के आद्रता राहत असल्याने उकाड्यात वाढ झालेली दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच नागरिकांकडून पंखे, कुलर, एसी आदी साधनांचा वापर करण्यात येत आहे़