मंदाणे येथे रेशन दुकानांना तहसीलदारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:40+5:302021-05-22T04:28:40+5:30

सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील रेशन दुकानांना तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी तहसीलदार ...

Tehsildar visits ration shops at Mandane | मंदाणे येथे रेशन दुकानांना तहसीलदारांची भेट

मंदाणे येथे रेशन दुकानांना तहसीलदारांची भेट

सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील रेशन दुकानांना तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी तिन्ही रेशन दुकानदारांना कोरोनाकाळात सद्य:स्थितीत राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत धान्याबाबत विचारपूस केली. त्यासोबतच किती धान्य वाटप झाले, किती शिल्लक आहे व शिल्लक असलेले धान्य कधीपर्यंत वाटप होईल याबाबत विचारणा केली. तसेच स्टॉक रजिस्टरची तपासणी करत एकही लाभार्थी कोरोना संकटात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या व मे, जूनमध्ये केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मोफत धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनवजा आदेश दिले.

यावेळी सरपंच विजय सनेर, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, पोलीसपाटील सुभाष भिल, कोतवाल विजय पावरा आदी उपस्थित होते.

Web Title: Tehsildar visits ration shops at Mandane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.