४५ वर्षीय नागरिकांना लसीकरण करण्यासाठी शिक्षक घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST2021-05-01T04:28:50+5:302021-05-01T04:28:50+5:30
त्या अनुशंगाने खांडबारा,शेही व श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, पंडित एंडायित,सुनीता अमृतसागर यांनी आपापल्या केंद्रातील शिक्षकांचे नियोजन करुन ४५ ...

४५ वर्षीय नागरिकांना लसीकरण करण्यासाठी शिक्षक घरोघरी
त्या अनुशंगाने खांडबारा,शेही व श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, पंडित एंडायित,सुनीता अमृतसागर यांनी आपापल्या केंद्रातील शिक्षकांचे नियोजन करुन ४५ वर्षीय लोकांनी लसीकरण करावे यासाठी केंद्रातील सर्व गावांमध्ये शिक्षक जाऊन नोंदणी करीत आहेत,लसीकरणाचे महत्व सांगून जनजागृती करताना दिसत आहेत.
४५ वर्ष व त्यावरील लाभार्थीची माहिती,आधारकार्ड नंबर,मोबाईल नंबर,जन्मतारीख सह घेण्यात येत असून लसीकरण झालेले व न झालेले यांच्या स्वतंत्र नोंद घेण्यात येत आहेत.
लसीकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांत घबराटीचे वातावरण असून शिक्षक स्वतःचे लसीकरण झाल्याचे सांगून प्रत्यक्ष मोबाईलमध्ये फ़ोटो दाखवून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत,आरोग्य विभागाने गाव ते गाव लसीकरण कॅम्प लावून गावातच सोयी उपलब्ध करून देण्यात यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दररोज झालेल्या सर्व्हेचा व लसीकरण जनजागृतीचा आढावा केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील खांडबारा, पंडित एंडाइत शेही, व श्रावणी केंद्राचा सुनीता अमृतसागर हे घेत असून तालुक्याचा आढावा गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे ,गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी व तहसीलदार मंदार कुलकर्णी हे घेत आहेत.
काही गावात बाहेरून शाळेत येणाऱ्या शिक्षकांनाही ग्रामस्थ मज्जाव करीत असून आपण आमच्या गावात येऊ नये असे सांगत आहे त्या सर्वांना शिक्षकांना समजावून लसीकरणाचे महत्त्व सांगत आहे.