घरीच पेपर तपासण्याचे आदेश असताना शिक्षक येताहेत शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:32 IST2020-03-19T12:32:17+5:302020-03-19T12:32:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत़ शासनाच्या आदेशाने शाळा बंद असल्याने ...

घरीच पेपर तपासण्याचे आदेश असताना शिक्षक येताहेत शाळेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत़ शासनाच्या आदेशाने शाळा बंद असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही घरीच राहण्याचे कळवण्यात आले आहे़ परंतू बऱ्याच शाळांमध्ये दहावीेचे पेपर तपासणीसाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याने शासकीय आदेशांचे गांभिर्य हरवले आहे़
शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी आदेश काढत दहावी व बारावीचे पेपर तपासणीचे काम शिक्षकांकडे येत आहे़ हे काम शिक्षकांनी घरी राहून करावे, शाळेतून पेपर घेत शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ यामुळे त्या-त्या शाळांनी तसा निर्णय घेत शिक्षकांना घरी जाऊन पेपर तपासण्याबाबत सहकार्य करुन कोरोनाची भिती कमी करण्याची गरज असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र जिल्ह्यातील काही ठिकाणी दिसून आले आहे़
विशेष म्हणजे या शिक्षकांसोबत शिक्षकेतर कर्मचारी, चौकीदार, रखवालदार यांच्यासह मुख्याध्यापक यांनाही शाळेत हजर रहावे लागत असल्याने कोरोना प्रतिबंध करण्याची उपाययोजना टांगणीला लागली आहे़ बºयाच ठिकाणी येणारे शिक्षक हे सॅनेटायझर्स आणि मास्क घेऊन येत असल्याने उपाययोजना होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू दिवसभर त्यांचा इतरांसोबत संपर्क येणारच असल्याने याबाबत तातडीने शिक्षण विभागाने निर्णय घेऊन शाळांना सूचना करण्याची अपेक्षा व्यक्त जिल्ह्यातील शिक्षकांकडून करण्यात येत आहे़