आॅफलाईन शिक्षणासाठी शिक्षकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:38 IST2020-10-12T12:38:29+5:302020-10-12T12:38:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषत: खेडोपाड्यात राहणाऱ्या अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्याकडे ...

आॅफलाईन शिक्षणासाठी शिक्षकांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषत: खेडोपाड्यात राहणाऱ्या अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे इच्छा असूनदेखील मुलांना ज्ञानापासून वंचित राहावे लागत आहे. अशातच मोरकरंजा येथील काही उच्च शिक्षित होतकरू नागरिक व गावातील शिक्षक आॅफलार्ईन शिक्षण देण्यासाठी धडपड करीत आहेत.
तालुक्यातील मोरकारंजा येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गावीत, सरपंच सुनील गावीत तसेच वन समितीचे अध्यक्ष संजय गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली मोरकारंजा येथील गावातीलच उच्च शिक्षित तरूण, युवक व स्थानिक शिक्षक गुलाबसिंग गावीत, प्राथमिकचे शिक्षक प्रवीण गायकवाड, मुख्याध्यापक लोटन शिंदे हे विद्यार्थ्यांना दररोज ११ ते दोन वाजेच्या दरम्यान शारीरिक अंतराचे नियम पाळीत ज्ञानार्जनाचे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासह निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धांचे शिक्षण देऊन त्यांची चाचणी परीक्षा घेऊन हसत खेळत शिक्षणाचे कार्य सुरू आहे.
अशा प्रकारे मोरकारंजा येथे अनेक दिवसांपासून शाळा बंद परंतु विद्यार्थांचे आॅफलाईन पद्धतीने शिक्षण चालू आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.