बालकांच्या विकासासाठी सातत्य आणि परिश्रमांची जोड देणारा शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:52 IST2019-09-05T14:52:36+5:302019-09-05T14:52:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील बामडोद या छोटय़ाशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा यंदा राज्यस्तरावर पोहोचली आह़े शाळेचे शिक्षक ...

बालकांच्या विकासासाठी सातत्य आणि परिश्रमांची जोड देणारा शिक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील बामडोद या छोटय़ाशा गावातील जिल्हा परिषदेची शाळा यंदा राज्यस्तरावर पोहोचली आह़े शाळेचे शिक्षक आनंदराव संपतराव करनकाळ यांच्याकडून आठ वर्षे बालकांच्या सर्वागीण विकासासाठी केलेल्या सातत्यापूर्ण प्रयत्नातून हे शक्य झाले आह़े
आनंदराव करनकाळ यांना राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार जाहिर झाला आह़े यातून एका शिक्षकाने आनंददायी शिक्षण देण्याच्या प्रयत्नाचे कौतूक झाले आह़े 2012 पासून खोंडामळी केंद्रातील सर्वात लहान अशा बामडोद जिल्हा परिषद शाळेत आनंदराव करनकाळ हे रुजू झाले होत़े बालकांचा सर्वागीण विकास या ध्येयाने पछाडलेले करनकाळ गुरुजी येथे रुजू झाले होत़े रुजू झाल्यानंतर विद्याथ्र्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवत असताना त्यांना कुमठेबीट जि़ सातारा येथे जाण्याची संधी मिळाली होती़ येथील ज्ञानरचनावादी शिक्षण उपक्रमाची माहिती घेतली़ बामडोद येथे आल्यानंतर विद्याथ्र्यामध्ये वाचन वाढीसाठी पहिला प्रयत्न म्हणून भारतरत्न डॉ़ ए़पी़जे अब्दुल कलाम यांच्या नावाने ग्रामस्थांच्या सहभागाने विद्यार्थी वाचनालय सुरु केल़े इंग्रजी आणि गणितासाठी भरपूर साहित्य उपलब्ध असले तरी इतिहासासाठी साहित्य नसल्याचे त्यांनी हेरुन विविध चित्रसाहित्याची निर्मिती करुन इतिहास पटवून देण्यास प्रारंभ केला़ विद्याथ्र्याना चित्रांमधून इतिहासी ओळख झाल्याने त्यांच्यातील गुणवत्ता वाढीचा हा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला़ याचप्रकारे इतरही विषयांचे साहित्य निर्माण करत विद्याथ्र्याना त्याची माहिती देत राहिल्याने विद्याथ्र्याच्या प्रगतीला प्रारंभ झाला़ गत आठ वर्षात त्यानी बामडोद शाळेत राबवलेल्या उपक्रमांत लोकांचा सहभाग वाढवत मुलांची प्रगती त्यांच्यासमोर मांडली होती़ पालकांनी या प्रगतीचा वेग कायम ठेवला आह़े