कोरोना लसीकरणावर शिक्षकांची जनजागृती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:23+5:302021-05-27T04:32:23+5:30
यावेळी केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी पिंपळोद केंद्रातील लसीकरण संदर्भातील गावनिहाय माहिती दिली. जि.प.शाळा पिंपळोदचे मुख्याध्यापक आसिफ शेख यांनी शिक्षकांनी ...

कोरोना लसीकरणावर शिक्षकांची जनजागृती सभा
यावेळी केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी पिंपळोद केंद्रातील लसीकरण संदर्भातील गावनिहाय माहिती दिली. जि.प.शाळा पिंपळोदचे मुख्याध्यापक आसिफ शेख यांनी शिक्षकांनी घरोघरी जाऊन रजिस्ट्रेशन व लसीकरणासाठी काही नागरिकांनी त्यांच्या मनातील भीतीपोटी लसीकरणास नकार दिला असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक रावसाहेब मराठे यांनी गावातून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक व गावातील काही कलाकारांच्या मदतीने गावात रॅली काढून, गीतगायन करून लोकांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. सुंदरदे केंद्रांतर्गत केंद्रातील एकूण १७ शाळांमधील सर्व शिक्षकांची माध्यमिक विद्यालय गुजरभवाली येथे सभा घेण्यात आली. चर्चेत आसिफ शेख, रावसाहेब मराठे, सुभाष सावंत, काशिनाथ पवार, मनोज चौधरी, रवींद्र पाटील, विनोद सोनवणे, दत्तू पाटील, विजय पवार, विलास खैरनार, रोहिणी पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.