रेन वॉटर हाव्रेस्टिंग व सौर ऊर्जाधारकांना करात सवलत
By Admin | Updated: February 16, 2017 00:24 IST2017-02-16T00:24:57+5:302017-02-16T00:24:57+5:30
नंदुरबार पालिकेने रेन वॉटर हाव्रेस्टिंग आणि सौर ऊज्रेचा वापर करणा:या घरमालकांना मालमत्ता करात अनुक्रमे पाच व दोन टक्के सूट जाहीर केली आहे.

रेन वॉटर हाव्रेस्टिंग व सौर ऊर्जाधारकांना करात सवलत
नंदुरबार : पाणी व सौर ऊज्रेला प्राधान्य देत नंदुरबार पालिकेने रेन वॉटर हाव्रेस्टिंग आणि सौर ऊज्रेचा वापर करणा:या घरमालकांना मालमत्ता करात अनुक्रमे पाच व दोन टक्के सूट जाहीर केली आहे. याबाबतचा ठराव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
रेन वॉटर हाव्रेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी पुनर्भरण करण्याची योजना राबविणा:या मालमत्ताधारकाला त्यांच्या करात कायमस्वरूपी पाच टक्के सूट राहील. याशिवाय जे नागरिक सौर ऊज्रेचा वापर करतील अर्थात दिवे, वॉटर, सोलर बसवतील किंवा बसवलेले असेल त्यांनाही दोन टक्के मालमत्ता करात सूट राहील.
यासाठी पालिका अभियंता आणि मालमत्ताधारकाचे तांत्रिक सल्लागार यांचा संयुक्त दाखला आवश्यक आहे.