प्रकाशा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST2021-07-27T04:31:55+5:302021-07-27T04:31:55+5:30

रविवारी पहाटे प्रकाशा रस्त्यावर तरस मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक संतोष इंदवे, डी.डी. पाटील, ...

Tarsa dies in vehicle collision on Prakasha Road | प्रकाशा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

प्रकाशा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

रविवारी पहाटे प्रकाशा रस्त्यावर तरस मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक संतोष इंदवे, डी.डी. पाटील, सुभाष घुसंडे, नंदकुमार थोरात, वाहन चालक नईम मिर्झा, सागर निकुंभे यांच्या पथकाने घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन मळ्यातून मृत तरस ताब्यात घेतला. उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात मयताचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर परदेशी यांनी केल्यानंतर नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले वनरक्षक बादशा पिंजारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकांविरोधात वन कायदा अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पहाटेच्या सुमारास अवजार वाहनाच्या धडकेत सदर मृत्युमुखी पडला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा होत असून याबाबत येथील ग्रामस्थांनी वनविभागाला तक्रार केली होती भक्ष्याच्या शोधात हा तरस आला असावा अशीही शंका व्यक्त केली जात आहे

Web Title: Tarsa dies in vehicle collision on Prakasha Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.